शेत रस्ता महसूल भूमी अभिलेख, पोलीस प्रशासनाच्या मदतीने खुला

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी): राज्य शासनाच्या पांधन मुक्त शेत रस्ता, अभियानांतर्गत रहिमाबाद सिल्लोड येथे गट क्रमांक २६४ मध्ये अडवलेला शेत रस्ता महसूल भूमी अभिलेख व पोलीस प्रशासनाच्या मदतीने खुला करण्यात आला. या शेत रस्ता खुला झाल्याने संबंधित शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले, रहिमाबाद येथील संजय कुलकर्णी, सुनील कुलकर्णी, भगवान शिरसाट, स्वामीनाथ डमाळे, संतोष कुलकर्णी यांचे सह शेतकऱ्यांचा शेत रस्ता काही शेतकऱ्यांनी गैरसमजातून आडवला होता.

याबाबत मामलेदार तथा तहसीलदाराकडे दाद मागण्यात येऊन तहसीलदारांच्या आदेशाने शेत रस्ता खुला करण्यासाठी मंडळ अधिकारी विशाल शेलकर,
भूमी अभिलेखचे भूमापक राजेंद्र गावंडे, पोलीस कर्मचारी सतीश पाटील, वैजनाथ चव्हाण, वैशाली सोनवणे यांच्यासह संबंधित शेतकऱ्यांना अडवलेला शेत रस्ता यंत्रसामुग्रीच्या साह्याने खुला करण्यात आला.

हा शेत रस्ता रहिमाबाद ते आव्हाना रस्त्यावर भिवपूर शिव रस्त्याकडे जातो. रस्ता खुल्या झाल्याने त्या भागातील शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतीत कामे करणे सुलभ होणार आहे. या संदर्भात शेतकऱ्यांच्या समस्या समज गैरसमज याची सांगड घालून संबंधितांना रस्ता खुला करण्याच्या प्रशासनाच्या या महत्वकांक्षी कामाने परिसरातील शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. बळीराजा पांदनमुक्त अभियान यशस्वीतेसाठी आशा भूमिकेमुळे गती येणार आहे